Mhada Lokshahi Din : ‘म्हाडा’चा नवीन वर्षात नवीन संकल्प; प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तथा अडचणी याबाबत न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो.

539
Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत
Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) येत्या नवीन वर्षापासून नवीन संकल्प केला आहे. येत्या नवीन वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘म्हाडा लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ११ वाजता म्हाडा लोकशाही दिनाचे (Mhada Lokshahi Din) आयोजन करण्यात येणार असून ‘म्हाडा’चे (MHADA) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, असे म्हाडाने जाहीर केले आहे. (Mhada Lokshahi Din)

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तथा अडचणी याबाबत न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो. त्याच धर्तीवर ‘म्हाडा’मध्ये (MHADA) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा दिन आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल. म्हाडा लोकशाही दिनासाठी (Mhada Lokshahi Din) अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे प्रपत्र १ अ ते प्रपत्र ड हे नमुने म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Mhada Lokshahi Din)

विषयाशी निगडित संबंधित विभाग/मंडळ प्रमुखही हजर राहणार

अर्जदाराची तक्रार तथा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तसेच अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे. नागरिकांना तात्काळ निर्णय देणे सुलभ व्हावे याकरिता विषयाशी निगडित संबंधित विभाग/मंडळ प्रमुखही हजर राहणार आहेत. तसेच म्हाडा लोकशाही दिनातील (Mhada Lokshahi Din) नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार आहे. (Mhada Lokshahi Din)

(हेही वाचा – Manisha Kayande : हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घाला; मनिषा कायंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)

अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसावे

न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात (Mhada Lokshahi Din) स्वीकारले जाणार नाहीत. (Mhada Lokshahi Din)

सविस्तर आढावा अहवाल तयार करून

जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करणे गरजेचे आहे. तसेच निवडणुकीकरता आचारसंहिता लागू केलेली असेल त्यावेळी म्हाडा लोकशाही दिनाचे (Mhada Lokshahi Din) आयोजन करण्यात येणार नाही. म्हाडा लोकशाही दिन झाल्यानंतर त्याच आठवड्यात बैठकीत प्राप्त विषयांचा सविस्तर आढावा अहवाल तयार करून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात येईल. (Mhada Lokshahi Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.