Meteorology Department: २४ तासांत मुंबई, ठाण्यात अवकाळी पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी? वाचा सविस्तर…

176
Department of Meteorology: पुढील २४ तासांमध्ये मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज, कोकणातील पर्यटन रविवारपासून बंद

बदलत्या हवामानामुळे देशांतील अनेक भागांत कुठे ऊन, तर कुठे पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. याचे दुष्परिणाम शेतीवरही होत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाच्या सरी, महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट आणि मुंबई, ठाण्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Meteorology Department)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह काही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट जारी
रविवारी, (२१ रविवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने, पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.