Melghat Earthquake : मेळघाट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! आठ महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका

Melghat Earthquake : मेळघाट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! आठ महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका

52
Melghat Earthquake : मेळघाट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! आठ महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका
Melghat Earthquake : मेळघाट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! आठ महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका

अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये बुधवारी (दि.४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे (Melghat Earthquake ) सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र धारणी तालुक्यात शिवझिरी होते. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र नागरी वस्तीत याचा काहीच परिणाम जाणवला नाही. (Melghat Earthquake )

हेही वाचा-Tatkal tickets आता केवळ ‘याच’ प्रवाशांना मिळणार ! रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय

गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. आठ महिन्यांपूर्वीच या भागाला भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा जमीन हागरली. नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. या भागात सातत्याने जमीन हादरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस या भागाला भूकंपाने हादरा दिला होता. (Melghat Earthquake )

हेही वाचा- Bengaluru Stampede : कर्नाटकातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर PM Narendra Modi म्हणाले …

प्रशासनाने 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत धारणी तहसीलदारांना माहिती दिली. संबंधित गावांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांना पाठविण्याच्या सूचना केल्या. बुधवारी झालेला भूकंप हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील भागांमध्ये झाला. अमरावतीसह अकोला आणि बुलढाणा तसेच मेळघाट सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे. (Melghat Earthquake )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.