Maratha Reservation : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

182

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी रोजी वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणासाठी  (Maratha Reservation) लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचा समुदाय घेऊन मुंबईकडे कूच करणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सरकारने त्यांच्या सर्व मागण्यांवर आश्वासने दिल्याने हा मोर्चा तूर्तास वाशी येथे थांबला आहे. पण ज्यांच्या ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडतील त्या मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही हे प्रमाणपत्र देण्यात यावे, तसा अध्यादेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. हा अध्यादेश २७ जानेवारी, दुपारी १२ वाजेपर्यंत काढा नाहीतर आम्ही आझाद मैदानाकडे कूच करू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळेच नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.

(हेही वाचा Gyanvapi ज्ञानवापी राष्ट्रीय स्मारक घोषित करून हिंदूंना द्या; ASI सर्वेक्षण अहवालानंतर काय म्हणाले याचिकाकर्त्यांचे वकील हरिशंकर जैन?)

या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.