Medical Hospital : धर्मादाय रुग्णालयांना शासनाची नियमावली

70
Medical Hospital : धर्मादाय रुग्णालयांना शासनाची नियमावली
Medical Hospital : धर्मादाय रुग्णालयांना शासनाची नियमावली
  • हिंदुस्थान ब्युरो

वैद्यकीय क्षेत्र हे सेवाव्रत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णसेवेचे महत्त्व लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे. तसेच, सामान्य माणसाचे आरोग्य उत्तम राहील, यासाठी सर्वच रूग्णालयांनी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करून चांगला पायंडा पाडण्याची गरज आहे. (Medical Hospital)

धर्मादाय रूग्णालयांनी निर्धन रूग्णांवर मोफत तसेच दुर्बल रूग्णांवर ५० टक्के सवलतीत उपचार करण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करावे. त्यासाठी १० टक्के खाटा निर्धन व १० टक्के खाटा दुर्बल रूग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, असा नियम आहे. त्यावर तेच रूग्ण असतील, याची दक्षता घ्यावी. निर्धन म्हणजे रक्कम रूपये एक लाख ८० हजारच्या आत उत्पन्न असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच दुर्बल म्हणजे रक्कम रूपये १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजार रुपयांदरम्यान उत्पन्न असलेल्या रूग्णांवर ५० टक्के सवलतीत उपचार केले जातात. (Medical Hospital)

(हेही वाचा – Hindusthan Samachar बहुभाषिक वृत्तसंस्थेचा 77 वर्षांच्या वाटचालीनिमित्त देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्काराने गौरव )

जिल्हा शल्यचिकित्सक तसेच साहाय्यक धर्मादाय आयुक्त व अन्य आरोग्य अधिकाऱ्यांनी धर्मादाय रूग्णालयांना अचानक भेटी देऊन नियमांचे पालन होत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. याचा दर महिन्याला आढावा होणे अपेक्षित आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारे अनामत रक्कम घेऊ नये. केवळ कागदपत्रांची पूर्तता नाही या कारणाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांना उपचार नाकारू नयेत. संबंधितांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. रुग्णालयांत गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता रूग्णालय व्यवस्थापनाने घ्यावी. तसेच, आयएमएच्या (IMA) पदाधिकाऱ्यांनीही यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग, बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिर (Health camp) आयोजित करावे. (Medical Hospital)

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती द्यावी. शासनाने केलेल्या नियमावलीची माहिती रुग्णांना रुग्णालय व्यवस्थापनाने द्यावी. तसेच रुग्णालय धर्मादाय असल्याचा नामफलक दर्शनी भागात लावावा. (Medical Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.