Student Special Scheme : विद्यार्थ्यांसाठी आता २० रुपयांत एक लाखाचा, तर ६२ रुपयांत ५ लाखांचा अपघात विमा

वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार

24
Student Special Scheme : विद्यार्थ्यांसाठी आता २० रुपयांत एक लाखाचा, तर ६२ रुपयांत ५ लाखांचा अपघात विमा
Student Special Scheme : विद्यार्थ्यांसाठी आता २० रुपयांत एक लाखाचा, तर ६२ रुपयांत ५ लाखांचा अपघात विमा

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी विमा योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तसेच विद्यापीठात प्रवेश घेतलेल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे पालकही या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभांचा लाभ घेऊ शकतात. विमा प्रीमियम रु.२० पासून सुरू होईल आणि त्यात वैद्यकीय आणि अपघात कव्हरेज समाविष्ट असेल. यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. (Student Special Scheme)

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल. २० रुपये प्रीमियम भरून एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर ६२ रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास ४२२ रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. दरम्यान, प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेली महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल.

(हेही वाचा : Chandrakant Patil : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध)

तसेच योजनेसाठी ‘ICICI Lombard’ इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. २० आणि ४२२ रुपये प्रीमियम असलेल्या योजना ‘आयसीआयसीआय’च्या असणार आहेत. तर ६२ रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.