Mechanical Sweeping : दक्षिण मुंबईतील व्हिआयपींच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडुद्वारे

दोन पाळ्यांमध्ये या यांत्रिक झाडुची सेवा घेण्यात येत आहे. प्रती किलोमीटरसाठी २०५२ रुपये मोजले जाणार आहे. त्यामुळे ६१०३ पाळ्यांसाठी एकूण १ कोटी ३० लाख २४ हजार २९० रुपये खर्च केले जाणार आहे.

883
Mechanical Sweeping : दक्षिण मुंबईतील व्हिआयपींच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडुद्वारे

मुंबईतील काही मोठ्या प्रमुख रस्त्यांची सफाई ही यांत्रिक झाडुद्वारे (Mechanical Sweeping) केली असतानाच आता दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर रोड, पेडर रोड आणि नेपेन्सी रोड यासह या विभागातील प्रमुख रस्त्यांची सफाईही यांत्रिक झाडुद्वारे (Mechanical Sweeping) केली जाणार आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी या यांत्रिक झाडुचा (Mechanical Sweeping) वापर या रस्त्यांवरील साफसफाई करता केली जाणार आहे. (Mechanical Sweeping)

महापालिकेच्या डी विभागामध्ये अर्थात दक्षिण मुंबईतील मलबार हिल आदी परिसरात व्हीआयपी मंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश व इतर न्यायाधिश तसेच अनेक राष्ट्रांचे सल्लागार व प्रतिनिधी, भारतातील आघाडीचे उद्योगपती, व्यापारी आणि सेलिब्रेटी राहत आहेत. शिवाय येथील वाळकेश्वर रोड, पेडर रोड व नेपेन्सी रोड यावर अतिमहत्वाच्या व्यक्तींची हालचाल असते. (Mechanical Sweeping)

(हेही वाचा – Matunga LBS Market : माटुंग्यातील लाल बहादूर शास्त्री मंडईची होणार डागडुजी)

इतका खर्च केला जाणार 

या कारणास्तव महापालिकेच्या डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी या विभागातील काही प्रमुख रस्त्यावर यांत्रिक झाडू (Mechanical Sweeping) व इतर संलग्न उपकरणे वापरुन याची सफाई करण्याच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला कळवले होते. त्यानुसार दोन पाळ्यांमध्ये या यांत्रिक झाडुची (Mechanical Sweeping) सेवा घेण्यात येत आहे. प्रति किलोमीटरसाठी २०५२ रुपये मोजले जाणार आहे. त्यामुळे ६१०३ पाळ्यांसाठी एकूण १ कोटी ३० लाख २४ हजार २९० रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी राम इंजिनिअरींग एँड कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mechanical Sweeping)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.