Maval Bridge Collapse : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून(Maval Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. पुल कोसळल्याच्या दुर्घटने(Maval Bridge Collapse)त २५ हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मावळमधील पूल दुर्घटने(Maval Bridge Collapse)संदर्भात विभागीय आयुक्त, तहसीलदार व पोलीस आयुक्तांशी बोलून माहिती घेतली. पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.(Maval Bridge Collapse)
Nagpur: On bridge collapsed on the Indrayani River, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “There has been an incident of bridge collapse in Maval. I have spoken to the Divisional Commissioner, Tehsildar and Police Commissioner. Some people have been injured and taken to the… pic.twitter.com/aAgbbgOM0Z
— ANI (@ANI) June 15, 2025
(हेही वाचा Maval मध्ये जुना पूल कोसळला; २० हून अधिक वाहून गेल्याची भीती )
ते पुढे म्हणाले, या दुर्घटने(Maval Bridge Collapse)त काही पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला(एनडीआरएफ)ला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफ पथक तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. काही पर्यटक वाहून गेल्याची शक्यता आहे असे सांगतानाच अद्याप त्यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आताच त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. तसेच, सद्यस्थितीस नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.
इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला
मावळ (Maval Bridge Collapse ) तालुक्यात मोठी दुर्घटना घडली असून कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात २५ हून अधिक पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे घडली. दरम्यान, रविवार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटने(Maval Bridge Collapse)बाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले. (Maval Bridge Collapse )
Join Our WhatsApp Community