Bandra Fire : वांद्र्यातील लिंक स्केअर मॉलला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Bandra Fire : वांद्र्यातील लिंक स्केअर मॉलला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

103
Bandra Fire : वांद्र्यातील लिंक स्केअर मॉलला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Bandra Fire : वांद्र्यातील लिंक स्केअर मॉलला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील स्क्वेअर मॉलच्या क्रोमा शोरूममध्ये आग (Bandra Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Bandra Fire)

हेही वाचा-“तुम्ही मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती करताय पण …” ; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून Supreme Court ने केंद्राला फटकारले

एमएफबीकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. एमएफबीच्या विनंतीनुसार, एनडीआरएफ तैनात करण्यात आले. एनडीआरएफची टीम सकाळी ७.५० वाजता पोहोचली. घटनास्थळावरून कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एमएफबीने आगीच्या ठिकाणाजवळील इमारत रिकामी केली आहे. (Bandra Fire)

हेही वाचा- ‘एलईडी’ द्वारे Fishing वर सर्व राज्यांनी बंदी घालावी; केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांचे निर्देश 

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या क्रोमा शोरूमला आग लागली असून यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही. (Bandra Fire)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.