Kamgar Hospital : मरोळ कामगार रुग्णालय अखेर ‘या’ दिवशी होणार सुरु

रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवा सुरु केली जाईल

121
Kamgar Hospital : मरोळ कामगार रुग्णालय अखेर 'या' दिवशी होणार सुरु
Kamgar Hospital : मरोळ कामगार रुग्णालय अखेर 'या' दिवशी होणार सुरु

आगीच्या दुर्घटनंतर गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेले मरोळ येथील कामगार रुग्णालय १४ ऑगस्टला सुरु होणार आहे. १४ ऑगस्टला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवा सुरु केली जाईल. या उदघाटन कार्यक्रमाला केंद्रीय कामगार मंत्री बुपेंद्र यादव तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णमित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते भीमेश मुथूला यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत येणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामगार रुग्णालय सुरु करावे लागले होते. आगीच्या दुर्घटनंतर इमारतीची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. कामगार रुग्णालय दोन वर्षांत सुरु करण्याचा मानस तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी दाखवला होता. प्रत्यक्षात कोविड काळात या बांधकामाला मोठी खिळ बसली. कामगार रुग्णालय बंद पडल्याने बरेचसे रुग्ण कांदिवली येथील कामगार रुग्णालयात किंवा मरोळ येथील पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी जातात.

(हेही वाचा – एमडी, एमएस डॉक्टरांवर तीन महिने बेरोजगारीची कुऱ्हाड)

परिणामी अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालय २०१८ पासून बंद असून आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय तातडीने सुरु करण्यासाठी आरोग्यमित्रांकडून सरकारला निवेदन देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या अधिनस्थ राज्य विमा निगम महामंडळाने इमारत दुरुस्तीसाठी रिकामी केली. रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम मे. एनबीसीसी या कंपनीला दिले. या रुग्णालयाच्या अग्नीसुरक्षेसाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केला जात होता. हे काम आता पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात ओपीडी, दुसर्या टप्प्यात ऍडमिशन घेतले जातील आणि तिसऱ्या टप्प्यात पूर्ण रुग्णालय सुरु होणार असल्याचे भीमेश मुथूला म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.