-
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने शेतमालाची खरेदी करताना व्यावसायिक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महासंघाची भूमिका महत्त्वाची असून, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करा! शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची मागणी; बंगालमधील हिंदूंवर अत्याचाराचा आरोप)
मुंबईत झालेल्या बैठकीत रावल (Jayakumar Rawal) यांनी महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक आनंद ऐनवाड, नितीन यादव, देविदास भोकरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. रावल म्हणाले, “१९५८ मध्ये स्थापन झालेल्या महासंघाने काळानुसार उद्दिष्टांत बदल करावा. तालुका खरेदी-विक्री संघाला विश्वासात घेऊन राज्य शासनाशी दुवा म्हणून काम करावे.” त्यांनी इतर राज्यांच्या चांगल्या कामाचा अभ्यास करून तिथल्या बाजारपेठांना महाराष्ट्रात आमंत्रित करण्याचे संकेत दिले.
(हेही वाचा – BMC : महापालिका म्हणते आता प्राथमिक सुविधांवर देणार भर; त्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय)
महासंघाने जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी करावी, केंद्राच्या योजनांतून व्यवसाय मिळवावा, मालमत्ता सुस्थितीत ठेवून भाडेतत्त्वावर द्यावी आणि आठवडी बाजारांसाठी जागा मिळवून द्यावी, असे रावल यांनी सांगितले. यासाठी पणन आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. डुबे पाटील यांनी सादरीकरणात ५११ पैकी फक्त १०४ पदे कार्यरत असल्याचे आणि मालमत्तांच्या दुरुस्तीची गरज असल्याचे नमूद केले. यंदा सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याबद्दल रावल (Jayakumar Rawal) यांनी महासंघाचे अभिनंदन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community