घाटकोपरमधील (Ghatkopar) एका सोसायटीत मराठी कुटुंबाला (Marathi family) अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला “तुम मराठी लोग गंदा है” असे म्हटल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena, MNS) या घटनेचा निषेध केला असून सोसायटीतील सदस्यांना समज दिली आहे.
(हेही वाचा – आप नेते Durgesh Pathak यांच्या घरावर CBI चा छापा !)
या घटनेनंतर हा प्रकार मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी माणसांना मुंबईत चुकीची वागणूक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून घाटकोपरमध्ये याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तेथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना चांगलीच समज दिली. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरून तेथील संबंधित गुजराती आणि जैन रहिवाशांना या घटनेचा जाब विचारत त्यांना खडसावलं. मात्र मराठी कुटुंबाला त्रास देणारी शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशांनी सारवासारव केली.
मनसे पदाधिकाऱ्याने या संदर्भातील पोस्ट केली असून त्यामुळे मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे नवा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
काय आहे राजेश पार्टे यांची पोस्ट ?
या घटनेसंदर्भात मनसेचे राजेश पार्टे (Rajesh Parte) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित व्हिडिओ देखील शेअर केला. घाटकोपरच्या सोसायटीमध्ये ते संबंधित नागरिकांना समज देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
ह्या घाटकोपरमधे (Ghatkopar) आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. पुर्ण सोसायटी गुजराती फक्त ४ जण मराठी. रोजचा ह्यांचा ञास मराठी माणसाला खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा आपमान. आज घुसलो कायते ऐकदा होऊनच जाऊदे. सगळ्यांची .. फाटली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community