Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या व्यासपिठावर ओवैसीची भाषा; विनोद शेलार यांची पोस्ट व्हायरल

377
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या व्यासपिठावर ओवैसीची भाषा; विनोद शेलार यांचा व्हिडिओ व्हायरल
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या व्यासपिठावर ओवैसीची भाषा; विनोद शेलार यांची पोस्ट व्हायरल

मराठा आंदोलकांच्या शिवराळ भाषेवरून गेले २ दिवस सभागृहात जोरदार चर्चा चालू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविषयी एकेरीत बोलल्याने भाजप नेत्यांनी त्यांना इशारा दिला आहे. अशातच भाजप नेते विनोद शेलार (Vinod Shelar) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Maratha Reservation)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinod Shelar (@bjpvinodshelar)

अकबर ओवैसी आणि मराठा आंदोलक यांची तुलना

मराठा आंदोलनातील तरुणाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ब्राह्मण समाजाला ३ मिनिटांत संपवू, अशी धमकी मराठा आंदोलक देत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. यापूर्वी एमआयएमचे धर्मांध नेते अकबर ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी ‘पोलिसांना बाजूला केल्यास १५ मिनिटांत हिंदूंना संपवू’, अशी जाहीर धमकी दिली होती. विनोद शेलार यांनी अकबर ओवैसी आणि मराठा आंदोलक यांची तुलना केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणानंतरही सरकारविरोधी आणि एकेरी वक्तव्ये करणारे मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.