Manoj Jarange : जरांगे यांनी शिस्तीत रहावे; मराठा महासंघाच्या मुंबईच्या माजी अध्यक्षांचा इशारा

Manoj Jarange : सरकारने १० टक्के आरक्षण दिले आहे. अगदीच काही दिलेले नाही, असे नाही. हा राजकीय लढा आहे. एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे; म्हणून त्याची आई-बहीण काढणे बरोबर नाही, असे सुनील पवार यांनी म्हटले आहे.

716
Manoj Jarange : जरांगे यांनी शिस्तीत रहावे; मराठा महासंघाच्या मुंबईच्या माजी अध्यक्षांचा इशारा
Manoj Jarange : जरांगे यांनी शिस्तीत रहावे; मराठा महासंघाच्या मुंबईच्या माजी अध्यक्षांचा इशारा

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींना तो शिवीगाळ करतो. नंतर माफी मागतो, हे काय नाटक चालू आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे खपवून घेणार नाहीत. तो काहीही बोलेल आणि ऐकून घेतील, ते मराठे असूच शकत नाहीत. महाराष्ट्राच्या मातीला फितूर मराठ्यांची परंपरा आहे. सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे असे अनेक होते. आम्ही शिवाजी महाराजांचे कट्टर मावळे आहोत. आम्ही कोणाला शिवीगाळी करणार नाही, असे परखड उद्गार शिवराज्याभिषेक समिति (Shivrajyabhishek samiti) रायगडचे अध्यक्ष आणि मराठा महासंघ (Maratha Mahasangh) मुंबईचे माजी अध्यक्ष सुनील पवार यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – Veer Savarkar : अभिनव भारत चळवळीच्या वाड्याचा पुनर्विकास करा; पण देखभालीची जबाबदारी वंशजांकडे द्या; वीर सावरकर यांच्या वंशजांची मागणी)

मराठा आंदोलकांच्या शिवराळ भाषेवरून गेले २ दिवस सभागृहात जोरदार चर्चा चालू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविषयी एकेरीत बोलल्याने भाजप नेत्यांनी त्यांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील पवार (Sunil Pawar) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही महाराष्ट्राची परंपरा नाही

सुनील पवार पुढे म्हणाले की, सरकारने १० टक्के आरक्षण दिले आहे. अगदीच काही दिलेले नाही, असे नाही. हा राजकीय लढा आहे. एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे; म्हणून त्याची आई-बहीण काढणे बरोबर नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. शिवाजी महाराजांचे मावळे हे कधीही सहन करणार नाहीत. जरांगे यांनी शिस्तीत रहावे.

दरम्यान, मराठा आरक्षणानंतरही (Maratha Reservation) सरकारविरोधी आणि एकेरी वक्तव्ये करणारे मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.