Manoj Jarange : आंदोलन सुरुच ठेवणार, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाने गाफील न रहाण्याचे आवाहन

Manoj Jarange : अध्यादेश निघाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे त्यांनी प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच रहाणार असल्याची घोषणा या वेळी मनोज जरांगेंनी केली.

165
Manoj Jarange : आंदोलन सुरुच ठेवणार, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाने गाफील न रहाण्याचे आवाहन
Manoj Jarange : आंदोलन सुरुच ठेवणार, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाने गाफील न रहाण्याचे आवाहन

मराठा आंदोलनप्रकरणी सरकारने परिपत्रक काढल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) आंतरवाली सराटीला परतले आहेत. तेथे स्थानिकांना संबोधित करत असतांना जरांगे यांनी उपोषणाविषयी मोठी घोषणा केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, जोपर्यंत सरकारच्या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु रहाणार आहे. या कायद्याअंतर्गत एका तरी मराठ्याला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले की, आंदोलनाचे काय करायचे, हे ठरवू. आपल्याला गाफील रहाता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना या कायद्याचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या-सोयऱ्यांना सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार, असे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्याचे फायदे)

सोमवार, 29 जानेवारी रोजी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे रायगडावर जाणार आहेत. 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. मनोज जरांगे यांनी त्याचे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळू दे, मग खरा गुलाल उधळू. त्या वेळी विजयी कार्यक्रम करू. सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्त्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध रहायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आंदोलन सुरुच रहाणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या महत्त्वाच्या मागण्यांमध्ये सगेसोयऱ्यांचा मुद्दा फार महत्त्वाचा होता. त्यामुळे या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी म्हटले की, सगेसोयऱ्यांचा कायदा झाला आणि त्याचा फायदा कुणालाच झाला नाही तर ? त्यामुळे सावध रहावे लागेल, हे आंदोलन गाफील ठेवून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.