Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur मध्ये ११८ मुसलमानांची नियुक्ती रद्द करण्याची मंदिर महासंघाची मागणी

श्री शनैश्वर देवस्थानमध्ये (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) केवळ मुसलमानच  नव्हे तर २०० हुन अधिक खिस्ती कर्मचारीही कार्यरत आहेत.

130

अहमदनगर येथील श्री शनैश्वर देवस्थानमध्ये (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) तब्बल ११८ मुसलमान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केली आहे.

या देवस्थानात (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) केवळ मुसलमानच  नव्हे तर २०० हुन अधिक खिस्ती कर्मचारीही कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे देवस्थानाचे पावित्र्य कमी होत आहे, त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी हकालपट्टी करण्यात यावी, असेही सुनील घनवट म्हणाले. पारंपरिक हिंदू मंदिर व्यवस्थापनात अशा प्रकारे इतर धर्मीय व्यक्तींची संख्याबळाने नेमणूक होणे हे श्रद्धाळूंमध्ये अस्वस्थता आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हिंदू धर्माच्या परंपरांनुसार मंदिर प्रशासन व पूजाअर्चा कार्यात धर्माचे पालन आवश्यक असते. त्यामुळे हा निर्णय देवस्थानाने रद्द करावा, अशी मागणी केली.

(हेही वाचा Bangladeshi Infiltrators : ऑपरेशन सिंदूरनंतर आता ‘पुश-बॅक’ ऑपरेशन सुरू; दिल्लीत पोलीस यंत्रणांची मोठी कारवाई)

यासंदर्भात श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शनी शिंगणापूरच्या (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) कार्यकारी अधिकारी यांनाही यासंदर्भात निवेदन पाठवले जात आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना हे निवेदन पाठवत असून त्यांनीही देवस्थानाकडून नेमणूक करण्यात आलेली इतर धर्मीय कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.