पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता या बंगाली हिंदू समाजासाठी धोका बनल्या आहेत. एवढेच नाही तर, बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न करण्याच्या मुद्द्यावर बोलताना, ममता बॅनर्जी संविधानापेक्षा वरच्या आहेत का, त्यांना हा अधिकार कुणी दिला? पश्चिम बंगालमधील धार्मिक हिंसाचाराला ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत. भाजप नव्हे, तर ममता बॅनर्जी याच धार्मिक तणाव पसरवत आहेत. त्याच समाजात तेढ निर्माण करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर झाले आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांची चूक काय?”, असा थेट प्रश्न मिथुन चक्रवर्ती यांनी उपस्थित केला आहे. ते एका वृत्तावाहिनीशी बोलत होते. (Murshidabad Violence)
(हेही वाचा – “… तर बाळासाहेबांनी लाथच घातली असती” ; Chandrashekhar Bawankule यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका)
मिथुन चक्रवर्ती मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराविषयी म्हणाले की, एक असा कायदा जो भारताच्या संसदेत पास झाला आहे. तो लागू न करण्याची शक्ती ममतांना कुणी दिली? त्या केवळ एक मुख्यमंत्री आहेत. त्या संविधानापेक्षा मोठ्या नाहीत. आता त्यांना काहीही वाचवू शकणार नाही. त्यांचा खेळ हिंदूंच्या लक्षात आला आहे.”
या वेळी मिथुन यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. (Murshidabad Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community