Melghat : मेळघाट आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न अधांतरिच! 

लहान वयात मुलींना गर्भधारणा होत असल्याने कुपोषित नवजात बालके जन्माला येत आहेत

22
Melghat : मेळघाट आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न अधांतरिच! 
Melghat : मेळघाट आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न अधांतरिच! 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न अद्यापही गंभीर अवस्थेत आहे. बालविवाह, बालपणात गर्भारपण, मातामृत्यू या सगळ्या समस्यांवर अद्यापही सरकारने मात केली नसल्याचा अहवाल बुधवारी दासबर्ग क्लिनिककडून प्रकाशित करण्यात आला.
लहान वयात मुलींना गर्भधारणा होत असल्याने कुपोषित नवजात बालके जन्माला येत आहेत. आदिवासी अजूनही रुढी परंपराच्या काही गैरसमजांमुळे सर्वच आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास कचरत असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले.दासबर्ग क्लिनिकचे डॉ. सुनील लांबे, डॉ. दिनक जैन, समाजसेवक गणेश लंबे, कमलेश यादव, जी. मुदलियार या टीमने मेळघाटात ग्राउंड झिरो अहवाल सादर केला आहे.
आम्ही 26 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी भागाला भेट देण्यात आली. येथील आदिवासी पाड्यांवर फिरून सरकारी सुविधांची स्थिती पाहिली. सरकारी योजना उत्तमरित्या राबवित असल्याचे दिसून आले. तरीही बालक आणि नव मातांमधील कुपोषणाचा प्रश्न दिसून येत असल्याचे दासबर्ग क्लिनिकचे डॉ. सुनिल लांबे यांनी सांगितले. येथील मूळ समस्येवर बोलताना डॉ. लांबे म्हणाले की, या ठिकाणी मुलींची लग्न वेळे आधी होत असल्याने लग्नानंतर नको त्या वयातच नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते.

हा गर्भधारणेचा दर मुलांची काळजी घेण्याच्या क्षमतेपेक्षा थोडा अधिकच आहे. हाच कळीचा मुद्दा असून यावर काम करण्याची गरज असल्याचे डॉ. लांबे यांनी स्पष्ट केले. तर डॉ. दिनक जैन यांनी प्रत्येक गर्भवती महिलांची शारिरीक स्थिती, तिचे मानसिक, भावनिक, शारीरिक आरोग्य केवळ होमिओपॅथिक औषधांनीच संतुलित होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.