Accident : अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात; कारमधील 10 जणांचा मृत्यू

210
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद शहराजवळ अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर बुधवारी, 17 एप्रिल रोजी एका भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने (Accident) कारमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नडियाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरीट चौधरी यांनी सांगितले की, कार अहमदाबादहून वडोदऱ्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर ट्रकच्या मागील बाजूस धडकली (Accident). आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, त्यांचा नंतर मृत्यू झाला.
नडियादचे आमदार पंकज देसाई म्हणाले की, काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रक महामार्गाच्या डाव्या लेनवर थांबला आणि कार चालकाला ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि तो अपघात झाला. अपघाताची (Accident) माहिती मिळताच द्रुतगती महामार्ग गस्ती पथकासह दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या संबंधित विभाग या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.