गुजरातमध्ये अंबाजी देवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांना भरधाव गाडीने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

86

गुजरातमध्ये एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. अंबाजी दर्शनासाठी जाणा-या 12 भाविकांना एका भरधाव कारने चिरडून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

6 जणांचा जागीच मृत्यू

हे सर्व 12 भाविक अंबाजी दर्शनासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील बहुतांश भाविक हे पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत तर इतरांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले असून, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

याआधीही गुजरातमध्ये अपघात

याआधीही रक्षाबंधनच्या दिवशी गुजरातमध्ये असाच भीषण अपघात झाला होता. तेव्हाही अपघातात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा अपघात गुजरात येथील आनंद जिल्ह्यात घडला होता. गुजरात येथील अंबाजी मंदिर हे शक्ती,भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचे म्हटले जाते. देश-विदेशातून या देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.