Mahim Building Collapse: मुंबईत जोरदार पाऊस; माहीममध्ये इमारतीचा भाग कोसळला

169

Mahim Building Collapse : मागील २४ तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई शहरासह विविध ठिकाणी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशातच पावसामुळे आता माहीम येथील एका जुन्या इमारतीचा भाग कोसळला आहे. (Mahim Building Collapse)

(हेही वाचा – Mumbai Rain : मुंबईत पहिल्या पावसाने 107 वर्षांचा विक्रम मोडला !)

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. अशातच माहीम रेल्वे स्थानक नजदीक मिया मोहम्मद छोटणी रोड, क्रॉस ३ रोड येथील, हाजी कासम नावाच्या चाळीत ही दुर्घटना घडली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, या घडलेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. संबंधित इमारत ही जुनी असून, या इमारतीमध्ये दोन नागरिक राहत होते. अग्निशामक दलाच्या बचाव पथकाने या दोघांना तातडीने बाहेर काढले असून, त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अशी माहिती अग्निशामक दलाने दिली. सध्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे कार्य सुरू आहे.

(हेही वाचा – Aqua Line Metro पहिल्या पावसात भुयारी मेट्रोची दैना; वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात भरलं पाणी, प्रवाशांनी व्यक्त केला संताप!)  

भुयारी मेट्रोची दैना; पाहिल्याच पावसात पडली बंद 
मान्सूनपूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेलं असताना सोमवारी २६ मे रोजी मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या वरळी-आरे भुयारी मेट्रो मार्गावरील वाहतूक सोमवारी पावसामुळे विस्कळीत झाली. वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक (वरळी नाका) सेवा ठप्प झाली असून तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात शिरले. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोईस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.