थॅलेसेमिया या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती करून प्रभावी उपचारांच्या माध्यमातून राज्यात थॅलेसेमिया (Thalassemia) मुक्तीचा निर्धार करण्यात आला आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी सांगितले.
८ मे रोजी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाचा शुभारंभ मंत्री आबिटकर (Prakashrao Abitkar) व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, थॅलेसेमिया रुग्णांच्या पुनर्वसनासाठी शासन नियमित रक्त संक्रमण, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखी उपचारपद्धती उपलब्ध करून देत आहे. मोफत आरोग्य सल्ला केंद्रांची उभारणी व १०४ क्रमांकावर आरोग्य सल्ला उपलब्ध आहे.
(हेही वाचा – Baloch Army ने पाकिस्तानी सैन्याचे उडवले वाहन; १२ पाक जवान ठार)
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर (Meghana Bordikar) म्हणाल्या की, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा हा उपक्रम असून, जनतेच्या सक्रिय सहभागाविना ही लढाई जिंकता येणार नाही. विवाहपूर्व चाचण्यांमधून थॅलेसेमिया (Thalassemia) रोखता येतो, यावर त्यांनी भर दिला.
या अभियानांतर्गत थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच www.thalesemiyasupport.com या वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी झाले.
“थोडीशी काळजी, पुढच्या पिढीचं आयुष्य वाचवू शकते” आणि “जीवन सक्षम बनवा, प्रगतीला स्वीकारा” या घोषवाक्यांतून थॅलेसेमिया-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधोरेखित करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community