Maharashtra Weather Update : राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ शहरांना दिला ‘येलो अलर्ट’

111
Maharashtra Weather Update : मुंबईसह राज्यभरात नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच काही ठिकाणी पाण्याची टंचाई (Water scarcity) जाणवू लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता काही जिल्ह्यांना भासू लागली आहे. अशातच राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विविध ठिकाणी सोमवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसादरम्यान वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत बुधवारपर्यंत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.    (Maharashtra Weather Update)

(हेही वाचा – Nashik Kumbh Mela 2027 साठी महानगरपालिका अधिग्रहित करणार एक हजार एकर जागा )
बुलढाण्यात अवकाळीचा फटका
बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district) लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी पाऊस, गारपिटीने नागरिकांची दैना उडाली. वीज कोसळून तीन गुरे ठार झाली. काही ठिकाणी लग्नसोहळ्यांनाही वादळाचा फटका बसला.

पिकांचं गारपिटीने नुकसान
वाशीम शहरासह रिसोडमध्ये सोमवारी दुपारी अवकाळी पावसासोबत गारपीट झाली. यात उन्हाळी मूग आणि भुईमुगाचे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील मोर्चापूर, गोंदापूर, सूरगाव, कान्हापूर, पवनारला गारपिटीचा फटका बसला.

(हेही वाचा – आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये Mining Sector मध्ये विक्रमी उत्पादनाची नोंद)

उत्तर महाराष्ट्रात गारपीट
नाशिक जिल्ह्यात मनमाड, तर जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा तालुक्यांत सोमवारी गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला. काही भागांत कांद्याचे नुकसान झाले. मनमाड शहर व परिसरात सोमवारी दुपारी गारपीट झाली. वीस ते पंचवीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा पिकाला फटका बसला आहे.

मराठवाड्यात तडाखा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. अंगावर वीज कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होईल, असा अंदाज आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांसाठी खुशखबर! या मार्गावर धावणार नवी Vande Bharat Train)
मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारी वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यात वादळामुळे लग्न सोहळ्यात धांदल उडाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे मांडव पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.