ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस (Maharashtra Weather) पडत आहे. भर उन्हाळ्यात पाऊस झोडपून काढताना दिसतोय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकांना छत्री घेऊन घराच्या बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईतही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांना मोठा फटका बसला. (Maharashtra Weather)
हेही वाचा-India Pakistan War : पाकिस्तान घाबरला ! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीत रात्रभर Blackout
दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून रायलसीमा, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात ढगाळ आकाश होत असून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली होती. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामनामुळं तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. (Maharashtra Weather)
अशातच हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे संकेत आहेत. कटाही परिसरात मारहाण होण्याचीही शक्यता आहे. तसेच कताही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community