Maharashtra Weather : वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार ! ‘या’ 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Weather : वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार ! 'या' 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

73
Maharashtra Weather : वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार ! 'या' 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather : वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार ! 'या' 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यभरातील वातावरणात (Maharashtra Weather) मोठे बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे, आता प्री मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत. (Maharashtra Weather)

हेही वाचा-FDI in Maharashtra : ब्लॅकस्टोन आणि राज्य सरकारमध्ये ५,१२७ कोटींचा सामंजस्य करार

पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा- Lead Turns Gold : शास्त्रज्ञांनी शिशाचं रुपांतर काही क्षणांसाठी सोन्यात केलं तेव्हा…

येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढून वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात आणि त्यानंतर ते हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये पसरतात. यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा- माजी FBI संचालकांची इन्स्टाग्राम पोस्ट अन् “८६४७” क्रमांक; Donald Trump यांच्या हत्येचा कट?, वाचा संपूर्ण बातमी

हवामान विभागाने येत्या चार आठवड्यातील पावसाचे विस्तारित पूर्वानुमानानुसार पहिला आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण भारत, महाराष्ट्र, पूर्व भारतातील अनेक भाग, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यात कर्नाटक, ईशान्य किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वायव्य भारत, तामिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक, केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.