
महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather) मोठे बदल होणार आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट दिला आहे. त्याचवेळी काही भागांत गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. तसेच मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याच्या अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-Mann Ki Baat : पीडितांना नक्कीच न्याय मिळेल ; ‘मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींचा पुनरूच्चार
राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशावर पोहचले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 27 एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी दिला आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना 28 एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा- World Bank : 10 वर्षांत गरिबीचा दर 14% ने कमी ; जागतिक बँकेचा अहवाल
नागपुरात गेल्या चार दिवसांपासून पारा 44 अंशावर आहे. वातावरणातील कोरडेपणामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे. 26 ते 29 एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात एक किंवा दोन अंशाची घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपुरात 45.4 आणि अकोल्यात 45.1 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविण्यात आले. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community