स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती द्वारा संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या निवासी सैनिकी शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दहावीचा मार्च 2025 मधील निकाल शत-प्रतिशत (100 टक्के) लागला आहे. (Maharashtra SSC Results 2025) बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. गेल्या 18 वर्षांमधील उज्ज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. या शिवाय शाळेतील 100 टक्के विद्यार्थी विविध शालेय उपक्रम, शाळांतर्गत स्पर्धा, तसेच विविध खेळांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत असून, तिथेही त्यांची उत्तम कामगिरी आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack मधील दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर; पोलिसांनी लावले पोस्टर्स)
विद्यालयाच्या प्राचार्या सौ. किशोरी भोईर मॅडम, तसेच संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील सर कार्यवाह रणजित सावरकर सर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव सर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेची पुढील वर्षाची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु असून पाचवी ते दहावी या वर्गासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. इच्छुकांना प्रवेश घेता येईल, अशी माहितीही प्राचार्या सौ. किशोरी भोईर मॅडम यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 8104863483, 8805085602, 7972413054 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra SSC Results 2025)
हेही पहा –