अयोध्येत उभे राहणार Maharashtra Sadan; २.३२७ एकरचा भूखंड उत्तर प्रदेश सरकारकडून मंजूर

1188
अयोध्येत उभे राहणार Maharashtra Sadan; २.३२७ एकरचा भूखंड उत्तर प्रदेश सरकारकडून मंजूर
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजुर केला असून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. (Maharashtra Sadan)
उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी हा भूखंड उत्तरप्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी ६७.१४ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण व अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे २६० कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती, काल सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावित जागेची अयोध्या येथे पाहणी केली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी.के.सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Sadan)
अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे ७.५ कि.मी. तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनपासून ४.५ कि.मी. अंतरावर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) उभारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर हे महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावं यासाठी महाराष्ट्रातील अनेक कारसेवकांनी बलिदान दिले. शेकडो नव्हे, हजारो कारसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांच्या त्याग आणि बलिदानातून आज रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहिलं असून  बालकरामाच्या प्रसन्न आणि सोज्ज्वळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात झाली आहे. दररोज लक्ष लक्ष भाविक अयोध्येत दर्शनासाठी जात आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्रातील भाविकांची अत्यंत लक्षणीय संख्या आहे. या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भक्त सदन उभं राहणार आहे असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.  (Maharashtra Sadan)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन बांधण्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेतला होता. त्यासाठी यापूर्वी अयोध्येत प्रत्यक्ष स्थळी जाऊन जागाही निश्चित केली होती. त्याच अनुषंगाने रविवारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री मार्फत सदर २.३२७ एकर जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला १०% रक्कम अदा केली. पुढील दोन महिन्यात जागेचा पूर्ण मोबदला अदा करून लवकरात लवकर भक्त सदन बांधण्याची कार्यवाही सुरु होईल असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Sadan)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.