Maharashtra Rain : मुंबई, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ; पुढचे २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार

Maharashtra Rain : मुंबई, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ; पुढचे २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार

82
Maharashtra Rain : मुंबई, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ; पुढचे २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार
Maharashtra Rain : मुंबई, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ; पुढचे २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार

अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ (Maharashtra Rain) आणि कमी दाबाचे क्षेत्र तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा-बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा; CM Devendra Fadnavis यांचा इशारा

मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यताही आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा- Made in India : भारताचं ३०,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीचं लक्ष्य

रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.