Maharashtra Rain : अवकाळीचे संकट कायम असताना दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार !

Maharashtra Rain : अवकाळीचे संकट कायम असताना दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार !

53
Maharashtra Rain : अवकाळीचे संकट कायम असताना दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार !
Maharashtra Rain : अवकाळीचे संकट कायम असताना दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार !

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे काल (शुक्रवारी दि. 23) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतर झालं आहे. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेलं नाही. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा असणारा धोका टळला आहे. मात्र, या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने रविवारी (दि. 25) अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा-पुण्यश्लोक Ahilyadevi Holkar यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन

शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते पुढील 24 तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत. त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा- Tribal जिल्ह्यांतील तरुणांना शासकीय नोकरीत मिळणार न्याय

राज्यातील शेतकऱ्यांसाठीची दिलासादायक बातमी आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा- BMC Election : मुंबईचा विकास आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीने; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तुलनेत शेलारांनी मारली बाजी

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.