गेल्या अनेक वर्षात पडला नाही इतका धुवाधार पाऊस (Maharashtra Rain) 48 तासात बारामतीत पडल्याने बारामतीकरांना त्याचा मोठा फटका बसला. गेल्या 48 तासात बारामतीत 307 मि.मी. पाऊस पडला. मे महिन्यात पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व समजला जातो, मात्र यंदा 1 मे पासून 26 मे पर्यंत एकटया बारामतीत तब्बल 480 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (Maharashtra Rain)
हेही वाचा-Raigad Rain : रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्ता खचला !
संपूर्ण पावसाळ्याची बारामतीची सरासरी ही 400 मि.मी. इतकी असते, हे या ठिकाणी महत्वाचे आहे. दुसरीकडे बारामती व इंदापूर तालुक्याच्या वेशीवरील बारामती अँग्रो कारखान्यानजिक सिध्देश्वर निंबोडी व शेटफळ या ठिकाणी काल चोवीस तासात 246 मि.मी. इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली. या भागातील जनजीवन या पावसाने पार विस्कळीत झाले असून ओढे नाले, दुथडी भरून वाहत आहेत. (Maharashtra Rain)
हेही वाचा- Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती …
26 मे सकाळी आठ या 48 तासात बारामतीत 307 मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासात बारामतीत 180 मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला. शासकीय नियमानुसार 65 मि.मी. हून अधिक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते. बारामतीत अतिवृष्टीच्या जवळपास तिप्पट पाऊस नोंदविला गेल्याने सगळीच यंत्रणा कोलमडून पडली. (Maharashtra Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community