
राज्यात (Maharashtra Rain) आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तसेच 19 ते 25 मे दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि घाट परिसरात अधिक पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
हेही वाचा-‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी YouTuber Jyoti Malhotra कोणाच्या संपर्कात ?
मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबई पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
हेही वाचा- India-Pakistan Tensions : भारत विरोध आणि पलायन; पाक सेनापतींची दयनीय अवस्था!
रत्नागिरी जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र, हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातला अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. रविवारी संध्याकाळी सह्याद्रीच्या दऱ्याखोरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. (Maharashtra Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community