maharashtra rain alert : हवामान विभागाने (Meteorological Department) रविवारी २५ मे रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी, मुंबई आणि कोकणात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस सुरू आहे. (maharashtra rain alert)
(हेही वाचा – pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराबाबत तुम्हाला ‘ही’ गोष्ट माहिती आहे का? देवऋषी नारदांनीही सांगितलं आहे महात्म्य)
भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यासह डोंगराळ भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट फक्त २५ आणि २६ मे या दोन दिवसांकरिता लागू करण्यात आला आहे, परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, जिल्ह्यातील भागांसाठी ऑरेंज अलर्ट पाच दिवसांसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळे वारे ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे,” असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
(हेही वाचा – Virat-Anushka ने घेतलं अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढी मंदिरात दर्शन !)
पुणे, मुंबईसह राज्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे, तर महाराष्ट्रातील काही इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community