युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारी वेबसाइट शत्रूकडून लक्ष्य; Cyber सेलकडून सूचक इशारा जारी

48
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारी वेबसाइट शत्रूकडून लक्ष्य; Cyber सेलकडून सूचक इशारा जारी
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारी वेबसाइट शत्रूकडून लक्ष्य; Cyber सेलकडून सूचक इशारा जारी
Cyber : भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, सरकारी वेबसाइट आता शत्रू देशाच्या रडारावर आहेत. तसेच भारत पाकच्या लष्करी तणावादरम्यान, सायबर हल्ल्यांचा (cyber attack) धोका देखील अधिक वाढला आहे. याबाबत, महाराष्ट्र सायबर विभागाने शनिवारी एक सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. तसेच यामध्ये सीमेपलीकडून शत्रू भारताविरुद्ध वेगळ्या प्रकारचे ‘सायबर युद्ध’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे यात सांगितले आहे. (Cyber)

(हेही वाचा – भारतीय वायूदलाचं Operation Sindhoor सुरुच !)

पाकिस्तानकडून भारतीय सरकारी वेबसाइट्सना लक्ष्य 
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘हे सायबर हल्ले विशेषतः सरकारी वेबसाइट्स आणि महत्त्वाच्या डिजिटल पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अफवा पसरवून प्रशासकीय कामात व्यत्यय आणणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. असे महाराष्ट्र सायबर विभागाने म्हटले आहे. तसेच अलिकडच्या काळात डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ले आणि डिजिटल डिफेसमेंट सारखे प्रयत्न वाढले आहेत. या हल्ल्यांचा उद्देश सरकारी सेवांमध्ये व्यत्यय आणणे आणि संस्थांची विश्वासार्हता खराब करणे आहे. हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

(हेही वाचा – India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले….)

महाराष्ट्र सरकारने इशारा दिला
याशिवाय, सायबर हल्लेखोर मालवेअरने संक्रमित फाइल्सद्वारे वैयक्तिक वापरकर्त्यांचे संगणक हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने सांगितले की, ते या क्रियाकलापांवर सतत लक्ष ठेवत आहे आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी वेळोवेळी सूचना जारी करत आहेत.

(हेही वाचा – India-Pakistan Ceasefire : पाकिस्तानचा इतिहास धोकेबाजीचाच)

यासोबतच, ज्या विभागांना आणि संस्थांना लक्ष्य करण्यात आले आहे त्यांना इशारा देण्यात आला आहे, तसेच सरकारी विभागांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले नोंदवले गेले आहेत, ज्यात पाकिस्तान, मध्य आशियाई देश आणि मोरोक्को सारख्या देशांमधील हॅकर गटांचा समावेश आहे, असे एका वरिष्ठ सायबर अधिकाऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.