भारतमातेचे नग्न चित्र काढणारा म.फि.हुसेन होता मोकाट; ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करणारी Sharmishtha Panoli मात्र तुरुंगात

Sharmishtha Panoli Case - अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ मुसलमानांपुरते मर्यादित आहे का ?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

95

भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्न, बिभत्स अन् विकृत चित्रे काढणारा चित्रकार म.फि. हुसेन (M.F. Husain) याच्या विरोधात भारतभरात १२०० हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या. असे असूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याऊलट ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तान्यांकडून होणाऱ्या टिकेला भारतीय नागरिक म्हणून जोरकसपणे उत्तरे देणारी शर्मिष्ठा पानोली (Sharmishta Panoli) नावाची विद्यार्थिनी (Kolkata Police) कारागृहात आहे. एक देश असून २ न्याय का, असा प्रश्न हिंदू समाज उपस्थित करत आहे.

(हेही वाचा – Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिक वर)

अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Speech) हे केवळ मुसलमानांपुरते मर्यादित आहे का ? धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याने होणारी कारवाई केवळ हिंदूंवरच का ? हिंदूंच्या भावना एकदा नव्हे, अनेकदा दुखावल्या जात असतांना संविधानातील तीच कलमे वापरून मुसलमानांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सामाजिक माध्यमांतून उपस्थित केला जात आहे.

शर्मिष्ठा पनोली प्रकरण काय आहे ?

ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल शर्मिष्ठा पानोलीने (Sharmishtha Panoli) एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीकाही होऊ लागली. त्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलिट करून माफीही मागिली. परंतु, तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी तिला समन्स बजावली आणि याप्रकरणी तिला १४ दिवसांची कोठडीही सुनावण्यात आली.

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात कोलकाता हायकोर्टाने शर्मिष्ठा पनोलीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. पुढील सुनावणीत हायकोर्टाने केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. “आपल्या देशातील एका वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या पाहिजेत असा होत नाही. आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे आपण सावधान राहिले पाहिजे, असे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले.

म.फि. हुसेन प्रकरणात मात्र पटियाला हाऊस कोर्टाने म्हटले होते की, याला आम्ही व्यक्तिगत तक्रार म्हणून पाहू. कारण यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे नाही. (Sharmishta Panoli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.