सांगलीत लव जिहादची (Love Jihad) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शामराव नगर महादेव कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय हिंदू धर्मातील अल्पवयीन मुलीला फसवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिचे अपहरण केले आहे. 24 मे पासून ही मुलगी बेपत्ता आहे. 23 दिवस झाले तरीही पोलीस प्रशासन याकडे लक्ष घालत नाही. मुलीच्या घरातील लोक सारखे पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस करत आहेत. मुलगी जिवंत आहे की नाही, ती कोणत्या परिस्थितीत आहे, या चिंतेत मुलीच्या आईची प्रकृती खालावली आहे.
A Hindu minor girl in #Sangli has been abducted by #Jihadi Chand Sheikh in the trap of #LoveJihad.
The girl has been missing since May 24Due to the negligence of @spsangli Shri. Sandeep Ghuge, the girl is still missing. Because of such officers, the lives of #Hindu girls are… pic.twitter.com/EWRGjllvRt
— Sakal Hindu Samaj (@sakal_hindu_) June 17, 2025
या प्रकरणी मुलीच्या आईने तिची कैफियत मांडली आहे. तिचा व्हिडीओ सकल हिंदू समाजच्या X अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मुलीची आई हतबल झालेली दिसत आहे. मुलीची आई म्हणते, २४ मे पासून माझी मुलगी बेपत्ता आहे. माझ्या मुलीला फसवून पळवून (Love Jihad) नेले आहे. मी पोलिसांकडे जाऊन माझ्या मुलीला शोधून आणण्यास सांगत आहे, पण पोलीस माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मी हतबल झाली आहे. आता मला मुलाकडचे माणसे धमक्या देत आहेत, असे त्या मुलीच्या आईने म्हटले आहे.
या पोस्टमध्ये धर्मांध मुसलमान चाँद शेखवर (Love Jihad) भारतीय न्याय संहिता कलम (BNS) १३७(२), १४३, १४४, ६४ आणि ७०(२), तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ (POCSO कायदा, २०१२) च्या कलम ४, ६, ८, १० आणि १२ आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींना संरक्षण देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community