Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

पुण्याची एकूण मतदार संख्या ८२ लाख ८२ हजार ३६३ आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार ५९६ इतकी आहे.

98
Lok Sabha Election 2024 : 'या' 16 जणांची टीम वाढवणार मतदानाचा टक्का...कोण आहेत 'ते' 16 जण? वाचा...

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. (Lok Sabha Election 2024)

पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार

पुण्याची एकूण मतदार संख्या ८२ लाख ८२ हजार ३६३ आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार ५९६ इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार ५८८, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ४८ लाख ०८ हजार ४९९ इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ इतकी आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – फ्रेंच क्रांतीत सक्रिय सहभाग घेतलेले महान शल्यविशारद James Parkinson)

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या १३ लाख ०३ हजार ९३९ असून यामध्ये ११ तृतीयपंथीयांची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार ०१२ आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ७२ हजार ९१६ इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या १२ लाख ७६ हजार ९४१ असून यामध्ये १२ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३७ हजार ६०९ आहे तर महिला मतदारांची संख्या ६ लाख ३९ हजार ३२० इतकी आहे. गोदिंया जिल्ह्यातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या १० लाख ९२ हजार ५४६ असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ४१ हजार २७२ आहे तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ५१ हजार २६४ इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या ६ लाख ६२ हजार ७४५ असून यामध्ये १ तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३० हजार ७१९ आहे तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३२ हजार ०२५ इतकी आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात ८ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ४ कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष मतदार तर ४ कोटी ४४ लाख ०४ हजार ५५१ महिला मतदार आणि ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. (Lok Sabha Election 2024)

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार २५२ आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार १४१ आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार ३५ लाख २२ हजार २८९ आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार ३१ लाख ७२ हजार ७९७ आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार ३० लाख ४८ हजार ४४५ आहेत. (Lok Sabha Election 2024)

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.