Lok Sabha Election 2024: ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले; जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले…

जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून माहिती कळवली.

150
Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे खळबळ माजली, मात्र डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध आहेत. व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

रविवारी, (२६ मे) सकाळी 9 वाजल्यापासून ते 9.4 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून माहिती कळवली. या माहितीला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसंबंधी Sanjay Shirsat यांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले… )

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीजपुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डिस्प्ले बंद झाले असले, तरी मात्र सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या काळातील व्हिडिओ शूटिंगदेखील केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.