चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार

190

चाकरमानी लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी आपल्या मुळगावी जातात, मात्र गावी जाण्यापूर्वीच कोकणकरांच्या (Konkan Ganpati Festival) वाटेला सतराशेसाठ विघ्न येताना दिसतात. यंदा गणपती उत्सव (Ganpati festival 2025) लवकर आल्याने कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाड्या (Konkan Railway Ganpati Special Railway) दरवर्षी प्रमाणे याही वेळी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने काही महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आता यावर्षी कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांना ६० दिवस आधी आरक्षित तिकीट काढावे लागणार आहे. यासाठी आता कोकण रेल्वेनेही पावसाळी वेळापत्रकात बदल करून गणपती स्पेशल आरक्षण लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Konkan Railway)

(हेही वाचा – जागतिक बुद्धिबळ खेळात चीनी खेळाडूचा पराभव; मराठमोळी कन्या Divya Deshmukh हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक!)

कोकण रेल्वेने दरवर्षी प्रमाणे याही वेळी गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चाकरमानी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी २ दिवस कोकणात जात असतात. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला असल्यामुळे चाकरमानी २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांचं आरक्षण करतील. याचपार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने यंदा २३ जूनपासून कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी रस्ते मार्गे किंवा रेल्वे मार्गे कोकणात पोहचतात. मात्र अद्यापही मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) बनलेला नसल्यामुळे चाकरमानी जास्त करून रेल्वे मार्गे कोकणात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या सुमारास २५० हून अधिक गणपती स्पेशल गाड्या सोडणार आहे. 

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : मुंबई पोलिसांच्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची विमानाने मायदेशात रवानगी)

आरक्षण दिनांक – प्रवासाचा दिनांक

  1. २३ जून, सोमवार – २२ ऑगस्ट, शुक्रवार
  2. २४ जून, मंगळवार – २३ ऑगस्ट, शनिवार
  3. २५ जून, बुधवार – २४ ऑगस्ट, रविवार
  4. २६ जून, गुरुवार – २५ ऑगस्ट, सोमवार
  5. २७ जून, शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार – हरितालिका
  6. २८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार – श्री गणेश चतुर्थी
  7. २९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार – ऋषी पंचमी
  8. ३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार
  9. ०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार
  10. ०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार – गौरी आगमन
  11. ०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार – गौरी पूजन
  12. ०४ जुलै, शुक्रवार – ०२ सप्टेंबर, मंगळवार – गौरी गणपती

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.