Female Sperm : रात्रीच्या जागरणाने होतोय स्त्री-बीजावर परिणाम!

असा निष्कर्ष २५ व्या युरोपियन एंडोक्राइनोलॉजी काँग्रेसच्या शोधनिबंधात मांडण्यात आला.

188
Female Sperm : रात्रीच्या जागरणाने होतोय स्त्री-बीजावर परिणाम!
Female Sperm : रात्रीच्या जागरणाने होतोय स्त्री-बीजावर परिणाम!

बदलत्या जीवनशैलीत रात्रभर जागरण सतत होत असल्यास स्त्री-बीजावर परिणाम होत असून मातृत्वाला बाधा होऊ शकते, असा निष्कर्ष २५ व्या युरोपियन एंडोक्राइनोलॉजी काँग्रेसच्या शोधनिबंधात मांडण्यात आला. अनियमित कामांच्या वेळामुळे मुलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे, त्यामुळे महिलांना आई होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो भीती तज्ञांनी व्यक्त केली.

तुर्की देशातील इस्तंबूल शहरात १३ ते १६ मे रोजी जगभरातील हार्मोन्स तज्ञांची परिषद आयोजित करण्यात आली होती. कामाच्या अनियमित वेळेमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल या परिषदेत शोधनिबंध सादर करण्यात आला. मानवी शरीराच्या दैनंदिन कार्यात झोपण्या-उठण्याची वेळ, हार्मोन्स बदल, पचनक्रिया आदी कार्य महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मानवी शरीर सूर्यप्रकाशात १४ तास चांगले कार्य करते. आधुनिक जीवनशैलीत माणसाला दिवसा आणि रात्रीही दोन पाळ्यांमध्ये काम करावे लागते. विशेषतः आयटी क्षेत्रात पुरुषांसोबत महिलाही नाईट शिफ्टमध्ये काम करतात.

शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये शारीरिक दिनक्रम हार्मोन्समधील बदल असंतुलित ठेवतो. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची कमी-जास्त वाढ स्त्री-बीजाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. स्त्री-बीज चांगले नसेल तर त्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो आणि गर्भधारणा राहण्यास अडथळे निर्माण होतात. इंडियन सोसायटी फॉर असिस्टेट रिप्रोडक्शनचे नियोजित अध्यक्ष आणि आयव्हीएफ तज्ञ डॉक्टर अमित पत्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट शिफ्टमध्ये महिलांनी काम करणे त्यांच्या प्रजनन क्षमतेसाठी चांगले नाही. स्त्री-बीज निर्मितीसाठी महिलांच्या मेंदूच्या मध्यवर्ती भागात असणारी पीनियल ग्रंथी उत्तेजित होणे गरजेचे असते. त्यासाठी महिलांना सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असतो. मात्र, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना सूर्यप्रकाश मिळत नाही.

(हेही वाचा – A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत)

परिणामी गुणवत्ता पूर्ण स्त्री-बीज तयार होत नाही. त्यामुळे गर्भधारणेस अडथळा निर्माण होतो. मानवी जैविक खड्याच्या विरोधात जाऊन काम केल्यास न्यूटेनिजिंग हार्मोन्सवर सुद्धा परिणाम होतो. परिषदेतील उपस्थित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजनन प्रक्रियेत स्त्री-बीजाची मुख्य भूमिका असते. चांगल्या स्त्री-बिजासाठी लुटेनिजिंग हार्मोन्सची गरज असते. मुल होण्यास व्यंधत्व केवळ स्त्रियांमध्ये नाही तर पुरुषांमध्येही दिसून येते. पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये ही दोष आढळून येतात तर महिलांच्या स्त्री-बिजामध्ये दोष दिसतो. सद्यस्थितीत या दोन्ही समस्यांवर उपचार उपलब्ध असल्याचे डॉक्टर सांगतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.