Landslide : अंधेरी पूर्व मधील चकाला येथे दरड कोसळून काही घरांचे नुकसान

121
Landslide : अंधेरी पूर्व मधील चकाला येथे दरड कोसळून काही घरांचे नुकसान

रायगड जिल्ह्याच्या इर्शाळवाडी दरड दुर्घटना ताजी असताना अंधेरी पूर्व येथील चकाला येथे दरड कोसळून (Landslide) काही घरांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. आज मंगळवार, २५ जुलै मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

(हेही वाचा – Gadchiroli Naxalism : दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी)

रायगड जिल्ह्याच्या इर्शाळवाडी दरड (Landslide) दुर्घटना ताजी असताना मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटी मध्ये दरड दुर्घटना घडली. मंगळवार २५ जुलै रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगरामधून सोसायटीचा पहिल्या मजल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा कोसळला. सर्व नागरिक झोपेत असताना ही (Landslide) दरड कोसळली. सुदैवाने या दरड दुर्घटनामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसली तरीही आर्थिक नुकसान मात्र फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

सध्या या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरड (Landslide) दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलीस घटना स्थळावर दाखल होऊन लोकांना बाहेर काढण्याचा काम करत आहेत. दरड कोसळलेल्या इमारतीमध्ये एकूण १६५ घरे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.