Lalit Patil Drug Case : ससूनचे माजी डीन संजीव ठाकूरांच्या मुलाचाही राजीनामा

ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर पदमुक्त

179
Lalit Patil Drug Case : ससूनचे माजी डीन संजीव ठाकूरांच्या मुलाचाही राजीनामा

काही दिवसांपूर्वी ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाबाबत पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. या दोघांवर बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले होते.

अशातच आता ललित पाटील (Lalit Patil Drug Case) या प्रकरणात पदमुक्त करण्यात आलेले ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या मुलाने देखील राजीनामा दिला आहे. डॉ. अमेय ठाकूर (Dr. Amey Thakur) असे मुलाचे नाव असून ते बी जे मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यपक म्हणूक कार्यरत होते. त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण समोर न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – Cyber Fraud : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद)

डॉक्टर संजीव ठाकूर पुण्यात (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयाचे डीन म्हणून रुजू झाल्यानंतर डॉक्टर अमेय ठाकूर हे बी जे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी डॉक्टर संजीव ठाकूर सोलापूरला शासकीय रुग्णालयात डीन म्हणून असताना डॉक्टर अमेय ठाकूर तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ज्याला सोलापुरातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. डॉक्टर अमेय ठाकूर यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती त्यांचे वडील डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या प्रभावातून झाल्याचा आरोप होत होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. (Lalit Patil Drug Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.