Lairaee Temple Stampede : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

Lairaee Temple Stampede : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

197
Lairaee Temple Stampede : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी
Lairaee Temple Stampede : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

गोव्याच्या शिरगावमधील प्रसिद्ध श्री लईराईच्या जत्रोत्सवामध्ये (Lairaee Temple Stampede) रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर साधारण 70 जण जखमी झाले आहेत. शुक्रवार, ०२ मे २०२५ पासून शिरगाव येथे लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जत्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, यात्रेच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले आहे. (Lairaee Temple Stampede)

हेही वाचा-Weather Update : उत्तरेकडील राज्यांना अवकाळीचा फटका ! वादळामुळे १० जणांचा मृत्यू

जखमींवर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. शिरगाव येथील लैराई जत्रा येथे झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले. जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संवाद साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. (Lairaee Temple Stampede)

हेही वाचा- भारताची निर्यात पोहोचली विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर; Reserve Bank of India चा अहवाल

या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता बळावली आहे. मात्र ही चेंगराचेंगरी नेमकं कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे, लईराई मंदिरात संशयास्पद हालचालींप्रकरणी २३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ड्रोन आणि साध्या वेशातील अधिकारी तैनात केले आहेत. (Lairaee Temple Stampede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.