Koyna Dam Reservoir : कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकास करणार……! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

101
Koyna Dam Reservoir : कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकास करणार......! 
Koyna Dam Reservoir : कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकास करणार......! 
महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण (Koyna Dam Reservoir) अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करणार,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निर्णयानुसार धरण क्षेत्राच्या सुरक्षितेतला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवले आहे. तसेच ७ किमी नंतरच्या २ किमी च्या क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित केले आहे.त्यापलीकडील जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे.यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा-Mahadev Online Gaming App: महादेव बेटिंग अॅपप्रकरणी ३४ चित्रपट कलाकार रडारवर, अनेक दिग्गजांचाही समावेश)

सातारा येथील शिवसागर अर्थात कोयना धरण (Koyna Dam Reservoir) येथील जंगले, सह्याद्री डोंगराच्या रांगा, निळेशार पाणी असे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पांचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल.या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या भागाचा शाश्वत आणि पर्यावरण आधारित विकासाला वेग देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=VkanL2nGgyk

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.