कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू; गाड्या फुल्लं महामार्गावर अभूतपूर्व कोंडी

108

गौरी-गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता कोकणातील चाकरमानी मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आहे. तर दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वेचे आरक्षण सुद्धा फुल्ल झाले आहे. माणगाव आणि इंदापूरजवळ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरापर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

( हेही वाचा : गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटसेवा पूर्ववत; ३ महिन्यांनंतर जलवाहतूक सुरू)

बसस्थानकांवरून जादा प्रवासी गाड्या

मुंबईतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवावासाठी कोकणात दाखल झाले होते. खासगी गाड्या, एसटी, रेल्वे गाड्यांमधून या चाकरमान्यांनी गावची वाट धरली होती. परंतु गौरी गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत यासाठी बहुतांश खासगी गाड्या, रेल्वेचे आरक्षण फुल्ल झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी देवगड बसस्थानकांवरून १५ जादा प्रवासी गाड्या बोरिवली, मुंबई, कुर्ला नेहरू नगर या मार्गावर रवाना झाल्या होत्या.

रेल्वे स्थानकांवर गर्दी 

गौरी – गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी सोमवार, मंगळवारी गणेशभक्तांची कोकणातील विविध रेल्वे स्थानकांवर झुंबड उडाली. राजापूर, रत्नागिरी, कणकवली, संगमेश्वर, चिपळूण, खेड या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.