Ganapati Special Trains : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, रेल्वेगाड्यांना जोडणार अतिरिक्त डबे

रेल्वे प्रशासनाकडून चाकरमान्यांना आवाहन

30
Ganapati Special Trains : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, रेल्वेगाड्यांना जोडणार अतिरिक्त डबे
Ganapati Special Trains : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, रेल्वेगाड्यांना जोडणार अतिरिक्त डबे

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांच्या तयारीला सुरुवात झाली, मात्र दरवर्षी कोकणात जाण्यासाठी होणारं तिकिट बुकिंग, प्रवाशांचे तिकिट वेटिंग, त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून रेल्वे कोकणवासीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने कोकण, मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण 22 फेऱ्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसमधील वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – Dombivli Traffic : वाहतूक कोंडीवर पोलिस मिळवणार नियंत्रण )

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी सीएसएमटी-मडगाव आणि सीएसएमटी-सावंतवाडी या दोन गणपती विशेष गाड्यांची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. या रेल्वेगाड्यांच्या प्रत्येकी 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाले आहे, मात्र प्रवाशांची वाढती मागणी आणि शेकडोंपार गेलेली वेटिंग लिस्ट लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक गाडीला शयनयान श्रेणीचे अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संस्ख्या 20 वरून 22 वर पोहोचणार आहे.

22 शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटींग कम लगेज या श्रेणीतील असणार आहेत.या दोन्ही रेल्वे गाड्यांचा सुधारित संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आपले तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरुवात करावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.