Drugs : कोकण किनारपट्टीला अंमली पदार्थांचा वाढता विळखा !

89

रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही चरसची पाकिटे सापडण्याचे सत्र सुरूच असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवारी दिवेआगर, भरडखोल किनारी तब्बल २१ पाकिटे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिासांनी रायगड, श्रीवर्धन किनाऱ्यांवरुन तीन दिवसात चरसची आत्तापर्यंत ८२ पाकिटे जप्त केली आहेत. जप्त मालाची किंमत ही चार कोटींच्यावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रायगड पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर शोध मोहीम सुरू आहे.

कोकण किनारपटटीवर चरसची पाकिटे सापडण्याचे प्रकरण सुरु असताना श्रीवर्धन तालुक्‍यातील वेगवेगळया किनाऱ्यांवर आतापर्यंत एकूण १०७ पाकिटे सापडली आहेत. पाकिटांचे वजन आणि पंचनाम्‍याचे काम अद्यापही सुरू आहेत. सापडलेल्‍या मालाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रूपये असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलिसांकडून श्रीवर्धनच्‍या किनारपटटीवर अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्‍यात अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवर आणखी पाकिटे सापडण्‍याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशी पाकिटे आढळल्‍यास पोलीसांना माहिती द्यावी, पाकिटे लपवून ठेवणाऱ्यांविरोधात गुन्‍हा नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

हेही वाचा – https://www.marathi.hindusthanpost.com/social/on-samruddhi-most-accidents-occur-in-the-morning-and-death-at-night/

ही पाकिटे किनार्‍यावर केव्हा आली असतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे कारण ती किनार्‍यावर जमा झालेल्या टाकाऊ पदार्थात सापडली आहेत. रत्नागिरी येथेही अशीच पाकिटे आढळून आली आहेत. प्लॅस्टिक पॅकिंगमुळे आतील पावडर व्यवस्थित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.सापडलेली पाकिटे आणि त्यांची ठिकाणं –
जीवना बंदर – ९ पाकिटे, मारळ बीच – ३० पाकिटे, सर्वे बीच – २४ पाकिटे, कोंडीवली बीच – ११ पाकिटे, दिवेआगर बीच – ३३ पाकिटे एकूण – १०७ पाकिटे
याशिवाय २७ ऑगस्ट – श्रीवर्धन जीवना बंदर ९ बॅग – १० किलो ३०० ग्राम, २८ ऑगस्ट – हरीहरेश्वर, मारळ किनारा ३० बॅग ३५ किलो, २८ ऑगस्ट रात्री – सर्वे किनारा २४ बॅग, २४ किलो ५५१ ग्राम इतके चरस सापडले आहे.

हेही पहा – Unique Celebration : नवी मुंबईत बहिणीने दिले भावाला नवे यकृत, भावा बहिणीच्या नात्याचं अनोखं सेलिब्रेशन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.