कॅनडातील (Canada) व्हँकुव्हर येथील ‘खालसा दिवाण सोसायटी’च्या गुरुद्वाराच्या भिंतीवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. या गुरुद्वाराला ‘रॉस स्ट्रीट गुरुद्वारा’ म्हणून ओळखले जाते. व्हँकुव्हर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Khalistani Terrorism)
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांच्या मुलीचा साखरपुडा झाला, त्या शांग्री-ला हॉटेलचे भाडे किती ?)
या घटनेनंतर गुरुद्वारा समितीने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खलिस्तानचा पुरस्कार करणार्या खलिस्तानवाद्यांच्या एका छोट्या गटाने ‘खलिस्तान जिंदाबाद’सारख्या फुटीर घोषणा देऊन आमच्या पवित्र भिंती विद्रूप केल्या. (Khalistan Slogans Canada)
आम्ही आमच्या समुदायाच्या इतिहासातील एका वेदनादायक क्षणाविषयी शोक व्यक्त करतो; कारण आम्ही ‘खालसा सजना दिवस’ (शिखांचे १० वे गुरु गोविंददेव सिंह यांनी ‘खालसा’ पंथ स्थापन केल्याचा दिवस) साजरा करण्यासाठी एकत्र येतो. हा दिवस शिखांची शक्ती, एकता आणि लवचिकता यांचे प्रतीक आहे. हे कृत्य कॅनडातील शीख समुदायात भीती आणि फूट निर्माण करू पहाणार्या आतंकवादी शक्तींच्या मोहिमेचा एक भाग आहे.
वर्ष १९०६ मध्ये स्थापन झालेल्या या गुरुद्वाराने गेल्या आठवड्याच्या शेवटी बैसाखी संचलन आणि ‘नगर कीर्तन’ आयोजित केले होते, ज्यामध्ये खलिस्तान समर्थक गटांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. (Canada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community