कॅनडातील ग्रेटर टोरोंटो एरिया (जीटीए) येथे रविवार, ५ मे या दिवशी खालसा डे परेड (Khalsa Day Parade) झाली. (Khalistani Terrorist) या कार्यक्रमात भाषणावेळी कॅनडातील खलिस्तान्यांकडून हिंदू समुदायाला देशातून बाहेर काढण्याचे आवाहन केले जात होते. यावरुन कॅनडातील (Canada) हिंदू समुदायाकडून खलिस्तानी दहशतवादी आणि समर्थकांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेमुळे कॅनडामधील हिंदू समुदायात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कॅनडामधील खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या परेडमध्ये ८ लाख हिंदूंना भारतात हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली. तसेच “Kill India” (भारताचा नाश करा) असे शब्द असलेले फलक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय नेत्यांवर टीका करणारी चित्रे, तसेच खलिस्तान समर्थक आणि इस्लामाबाद यांच्यातील ऐक्य दर्शविणारे दृश्य प्रदर्शित करण्यात आली.या प्रकारामुळे भारत सरकारने कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकारांमुळे भारत-कॅनडा संबंधांवर (India-Canada Relations) नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी स्पष्ट समज देखील कॅनडाला दिली आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कॅनडातील विविध हिंदू समुदायांनी एकत्र येऊन शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश देण्याची गरज भारताने व्यक्त केली आहे.
कॅनडाच्या टोरंटो (Toronto) येथील माल्टन गुरुद्वारात हिंदूविरोधी परेड आयोजित करण्यात आली होती. परेडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कॅनडामधील एका हिंदू समुदायाच्या नेत्याने पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी खलिस्तानी दहशतवादी गटाकडून “घोर हिंदूविरोधी द्वेष” केला जात होता. “हा भारत सरकारविरुद्धचा निषेध नाही. कॅनडातील सर्वात घातक हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध, तरीही राहण्याचा अधिकार अभिमानाने सांगणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गटाकडून हा उघड हिंदूविरोधी द्वेष असल्याचा दावा खलिस्तानी दहशतवादी ” शॉन बिंडा यांने ट्विट करत म्हटले आहे. (Khalistani Terrorist)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community