कॅनडाच्या (Canada) न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आणि खलिस्तान समर्थक (Pro-Khalistan) जगमीत सिंग यांचा २०२५ च्या कॅनडाच्या संघीय निवडणुकीत पराभव झाला आहे. जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांना पाठिंबा देणाऱ्या या पक्षाने भारताविरुद्ध प्रचंड गरळओक केली होती. ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंध अलिकडच्या सर्वांत खराब टप्प्यावर आले. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांच्या लिबरल पक्षाने सोमवार, २८ एप्रिल या दिवशी झालेल्या संघीय निवडणुकीत विजय मिळवला. निवडणूक निकालांमधून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पराभवाचा सामना करणाऱ्या लिबरल पक्षाचा विजय झाला आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा वर्षा बंगल्यात गृहप्रवेश ; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सपत्नीक गृहप्रवेश)
या निवडणुकीत खलिस्तानी नेते जगमीत सिंग (Jagmeet Singh) यांचा पक्ष एनडीपीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग स्वतः ब्रिटिश कोलंबियातील बर्नाबी सेंट्रल येथून निवडणूक हरले आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमावला आहे. राष्ट्रीय पक्षाला किमान १२ जागा हव्या होत्या; पण त्यांना फक्त ७ जागा मिळाल्या. या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत जगमीत सिंह यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जगमीत सिंह गेल्या ८ वर्षांपासून पक्षाचे प्रमुख होते.
जगमीत सिंग यांच्या पक्षाचा दारूण पराभव कॅनडामधील खलिस्तानवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पराभवामुळे भारत आणि कॅनडामधील राजनैतिक आणि व्यापारी संबंध पुन्हा स्थापित होण्यास मदत होईल. अलीकडच्या काळात, जगमीत सिंग आणि माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यातील युतीमुळे भारतासोबतचे राजनैतिक संबंध बिघडले होते. त्यांच्या सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोपही केला. एवढेच नाही, तर पंतप्रधान ट्रुडो यांनी २०२० मध्ये भारतातील शेतकरी आंदोलनाच्या बाजूने विधान केले होते. असे करणारे ते जगातील एकमेव नेते होते. जगमीत सिंग यांनी भारतावर केलेल्या टीकेमुळे राजनैतिक संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांना वर्ष २०१३ आणि २०१८ मध्ये भारताने व्हिसा नाकारला. राजकीय कारणांमुळे भारतात प्रवेश करण्यास बंदी घातलेले ते पाश्चात्य देशातील पहिले आमदार असल्याचे बोलले जाते. भारताने ट्रुडो प्रशासनावर खलिस्तानवाद्यांबद्दल मवाळ भूमिका स्वीकारल्याचा आरोपही केला होता. आता नवीन परिस्थितीत, भारत-कॅनडा संबंध सुधारू शकतात. (Canada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community